आरोग्यधाम- आ- आनंदी, रो- रोगमुक्त, ग्य- (ग+य)- ग- मनातील सकारात्मक विचारांची गती वाढवणारं, य- यम यातना कमी करणारं, धा- धारणाशक्ती वाढवणारं व म- मती स्थिर करणारं मंदिर म्हणजेच “आरोग्यधाम”.
२००७ पासून “आरोग्यधाम” ची वाटचाल सुरु झाली. कुणाला आहाराने, कुणाला आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, तर कुणाला पंचगव्य, निसर्गोपचाराने बर वाटू लागलं. वयाच्या ३६ व्या वर्षी अंधत्व आलेल्या व्यक्तीला उपचाराच्या ९ महिन्यांनी दिसायला लागणं, दररोज dialysis चा रुग्ण बावीस दिवसापर्यंत ते पुढे नेऊ शकतो; एक एक थेंब फक्त पाणीच पिऊ शकणारा कर्करुग्ण भाकरी खाऊ शकतो; लिगामेंट तुटलेली व वॉकरवरच चालावं लागणार अशा मानसिकतेतून प्रत्यक्ष जिने चढ-उतार करणारी व्यक्ती; “गुढघे बदला” [nee- Transplant] म्हणून सल्ला दिलेली रुग्ण व्यक्ती दोनशे पाऊले न थांबता चालू शकते; आठ-आठ वर्षे संतानहीन दांपत्याला स्वतःचं बाळ मिळू शकतं; दहा वर्षांपेक्षा जास्त काळ मधुमेहग्रस्त व्यक्ती गोळ्या insulin शिवाय जगू शकतो; महिना महिना झोप न लागणारी व्यक्ती कोणत्याही गोळी शिवाय झोपू शकतो; सात सात दिवस शौचाला न जाणारी व्यक्ती दररोज नैसर्गिक विधी करू शकतो; गाउट, संधिवात, आमवात, पित्तविकार, कफ विकारांचे जुनाट व्याधींचे रुग्ण जर अवघ्या नऊ ते पंधरा दिवसात सकारात्मक मानसिकता घेऊन ५०% हून जास्त बरे व्हायला लागतात म्हणजेच हा ईश्वरीय संकेत आहे की “आरोग्यधाम” ची रुग्ण सेवा ही ईश्वरीय अधिष्ठानावर, गुरु व व्याधीमुक्त व्यक्तींच्या आशीर्वादावर चालू आहे.
म्हणूनच आधुनिक वैद्यकशास्त्रातील कोणत्याही उपचार पद्धतीचा अवलंब न करता आयुर्वेद, होमिओपॅथी, पंचगव्य, निसर्गोपचार, योग, प्राणायाम, आसनं, अक्युप्रेषर, मुद्रा, आहार, घरगुती उपचार इ. त्या त्या रुग्णाच्या व्याधीनुसार व आजाराच्या गरजेनुसार वापरून रुग्ण कमीतकमी कालखंडात अशा संयुक्त उपचारातून बारा होऊन,त्याला व्याधीमुक्तीसाठी स्वावलंबी सकारात्मक मानसिकतेचा संकल्प, हृदयापर्यंत पोहोचवण्यात “आरोग्यधाम” चा खारीचा वाटा- हा ईश्वरीय माध्यम म्हणून काम करतो.
जे- जे रुग्ण दिलेल्या सूचना, सांगितलेलं पथ्य/ अपथ्य दिनचर्या तंतोतंत पाळतात त्यांचा आत्मविश्वास वाढून ते वर्षभरात व्याधीमुक्त झालेले पाहायला मिळतात म्हणूनच रोगी व अस्वस्थासाठी- व्याधीमुक्ती व स्वस्थता लागण्यासाठी उपचार व निरोगी व स्वस्थांसाठी- प्रतिबंधात्मक उपचार...- जसे आपण ५० हजाराची दुचाकी व पाच लाखाची चार चाकी दरमहिना सर्व्हिसिंग करतो- तेल बदलतो, प्रत्येक सांध्यांना ग्रीस लावतो. तसे देहाचे- शरीराचे व मनाचे प्रतिबंधात्मक सर्व्हिसिंग [over oiling/ शुद्धीक्रिया ] “आरोग्यधाम” मध्ये केल्यास एक सकारात्मक दिशा पुढील आयुष्याला मिळेल यात तिळमात्र शंका नाही.