अखंड भारताची स्थिती पाहता संपुर्ण घरामध्ये एकातरी व्यक्तीला कोणत्यातरी आजारासाठी गोळी / औषधं घ्यावी लागतात. हे चित्र सार्वत्रिक आहे की जे सर्वांसाठी आदर्श नसून धोकादायक आहे. कोणत्याही रुग्णाला त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार व्याधी मुक्त करत त्या व्याधीमुक्तीसाठी स्वावलंबी बनवण्याचा संकल्प मनात रुजवण्याचे कार्य “आरोग्यधाम” करीत आहे..
आरोग्यधाम- आ- आनंदी, रो- रोगमुक्त, ग्य- (ग+य)- ग- मनातील सकारात्मक विचारांची गती वाढवणारं, य- यम यातना कमी करणारं, धा- धारणाशक्ती वाढवणारं व म- मती स्थिर करणारं मंदिर म्हणजेच “आरोग्यधाम”.
अपवाद सोडला तर जन्मलेलं तान्ह मुल हे आईचं जोपर्यंत दुध पितय व त्याला बाहेरील पदार्थांची आवडनिवड वृत्ती येत नाही तोपर्यंत 100% निरोगी असतं---- म्हणजेच सुमारे पहिले वर्षभर नंतर आहार व आहाराच्या आवडीनिवडीत गुंतलेलं मन त्याला आजारी बनवतं.
शरीर व मनाने- काय, केव्हा, किती, कुठे, व कसं खावं प्यावं एवढ्या पाच गोष्टींवर आपलं रोगी- निरोगीपण (शरीर व मनाचं) अवलंबून असतं आणि म्हणूनच “रोगीपासून निरोगीपर्यंत, अस्वस्थापासून स्वस्थापर्यंत, रोग अनेक उपचार केंद्र एक” - आरोग्यधाम.
- संधिवात, आमवात
- वजन कमी / जास्त करणे
- हृदय विकार
- रक्तदाब
- कोलेस्टेरोल
- फिट्स
- मणक्याचे विकार
- स्त्रियांचे आजार
- मधुमेह
- किडनी विकार
- अनिद्रा
- पुरुष व स्त्री वंध्यत्व