1)निसर्गोपचार म्हणजे काय ?
उ.- निसर्गाशी प्रतारणा न करता, त्याला अनुकूल राहून, त्याच्याच मदतीने व्याधीमुक्त जीवन जगण्याची उपचार पद्धती.
2)आरोग्यधामच का ?
उ.- आ- आनंदी, रो- रोगमुक्त, ग्य(ग+य) ग- शरीर मनाची गती सामान्य ठेवत, य- यमयातना कमी करून, धा- धारणाशक्ती वाढवणारी, म- मठी (मंदिर).
3)नाडीपरीक्षण का?
उ.- भारतीय संस्कृतीमधील असंख्य देणग्यांपैकी असलेलं साधन म्हणजे नाडीपरीक्षण ज्यात वात, पित्त, कफ दोषांमुळे उद्भवणाऱ्या केवळ व्याधी- निदानापर्यंत परीक्षण नसून त्रीदोषाच्या कारणाचेही परीक्षण होते.
4)नाडीपरीक्षण व योगप्राणायाम आपण मोफत का करता?
उ.- आमचे गुरु प. पु. स्वामी रामदेवजी महाराजांनी दिलेल्या दिक्षेनुसार जे ज्ञान स्वतः निर्माण केलं नाही किंवा ज्याला भौतिक खर्च येत नाही व जे देऊन इतरांच भल होईल अशा ज्ञानाचा बाजार मांडू नये म्हणून योगप्राणायाम व नाडीपरीक्षण आपण मोफत करतो.
5)मग आपण नोंदणी शुल्क घेता का?
उ.- होय! प्रथम नोंदणी शुल्क आरोग्यधाम मध्ये घेतले जाते. जिथे रुग्णाची संपूर्ण माहिती संगणीकृत करून ठेवली जाते. पुढच्या कुठल्याही आढावा तपासणीला शुल्क आकारले जात नाही.
6)आपल्या निवासी निसर्गोपचार केंद्राची वैशिष्ट्ये काय आहेत?
उ.- अ) रुग्णाचा आजार जवळून अभ्यासता येतो. ब) रुग्णाच्या आजारानुसार आहार देणे सोपे जाते व तसा आहार प्रमाणित करता येतो. क) आपुलकी, प्रेम, वात्सल्यामुळे रुग्ण- रुग्ण न राहता आपोआप आपण निरोगी झालो आहोत/ होत आहोत असे भाव प्रकट करून, रोगमुक्त होऊ लागतो.
7)आपणाकडे निवासी निसर्गोपाचारासाठी कमीत कमी किती दिवसांची उपचार पद्धती दिली जाते?
उ.- कमीत कमी नऊ दिवस.
8)कोणकोणत्या व्याधींसाठी ही निवासी निसर्गोपचार पद्धती आपण अमलात आणता?
उ.- जुनाट सर्वच आजार, संधीवात, मुल न होणे, गर्भधारणेपूर्व संस्कार, गर्भसंस्कार, स्त्री- पुरुष वंधत्व, स्त्रियांचे आजास फायब्रायड, सीस्ट, स्टोन, किडनी विकार, हृदयविकार, अनिद्रा, अर्धशिशी, फिट्स, लहान मुलांचे आजार.
9)आरोग्यधामचे वेगळेपण काय आहे?
उ.- व्यक्ती आजारी पडल्यानंतर इस्पितळात जाऊन सलाइन आदी उपचार घेतो; तो तसा घ्यावा लागू नये म्हणून व एखादा मोठा आजार पूर्वायुष्यात होऊन गेला असल्यास व्याधीमुक्त होणे व व्याधीची पुनरावृत्ती टाळणे.
10)इतर व्याधीनिवारण केंद्र व आरोग्यधाम यात फरक कोणता?
उ.- आरोग्यधाम- सिंधुदुर्ग योग निसर्गोपचार मध्ये किमान नऊ दिवस राहून गेलेली व्यक्ती सांगितलेल्या नियमांचे पालन करीत असल्यास पुन्हा कोणत्याच आजारासाठी औषधे अथवा डॉक्टरची जरुरी न भासता, स्वतःच आत्मनिर्भर होऊन स्वतःहाचाच उपचार करण्याइतपत सक्षम बनते.
11)आपण आपल्या आरोग्यधाम मार्फत कोणता संदेश लोकांना देऊ इच्छिता?
उ.- आपण आपल्या वाहनचं सर्व्हिसिंग/ overoilling दरमहा/ दोन महिन्यांनी करतो व गाडीचे अवयव खराब होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. मग आपल्या लाख मोलाच्या देहाचं सर्व्हिसिंग (शुद्धीक्रिया) मनासकट वर्षातून एकदातरी करून घेऊन 100 वर्षाचं निरोगी आयुष्य जगावं म्हणूनच आरोग्यधामला अवश्य भेटा.